Strengthening the health system in view of the possible third wave of the corona.
Govt focuses on strengthening the health system in view of the possible third wave of the corona – Deputy Chief Minister Ajit Pawar.
Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the measures including the corona outbreak situation in the Pune district..
The third wave of the corona is expected, medical experts say. Given the possibility of a third wave, the government is focusing on strengthening the health system. Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar today directed that the district should be self-sufficient in oxygen along with increasing the oxygen capacity. He also instructed the system to keep the treatment facilities in rural areas well equipped along with the metropolis.
Planning to vaccinate 1.5 lakh citizens daily in the district as soon as adequate vaccines are available from the Central Government
In addition to increasing the oxygen capacity, the district needs to be self-sufficient in oxygen
Everyone has a responsibility to follow the rules of Covid
There is a need to be more vigilant about the availability of facilities like oxygen systems, ventilators, manpower etc.
Priority should be given to strengthening all facilities of the rural health system
Deputy Chief Minister Ajit Pawar
A review meeting on Corona situation and measures in the district was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar at Council Hall of Pune Divisional Commissioner’s Office.
On this occasion, Deputy Chief Minister Ajit Pawar said that the administration needs to be more vigilant about the availability of facilities like oxygen systems, ventilators, necessary trained manpower besides keeping the rural health system equipped against the backdrop of the possible third wave. He said that immediate medical facilities should be made available to the patients in the rural areas and strengthening of all the facilities in the rural health system was the first priority.
Instructing the police administration to take appropriate precautions to control the growing crowd, Deputy Chief Minister Ajit Pawar said, “Everyone has a responsibility to abide by the Kovid Prevention Rules.” Even now, in connection with the possible third wave, various health facilities like the setting up of oxygen plants, separate hospitals, separate treatment facilities for children are being set up. Similarly, the chain of surveys, contacts and coordination is directed to be maintained intact. Everyone needs to realize that Corona’s accompaniment is not over yet. He also said that after the large supply of vaccines from the central government, it was planned to vaccinate 1.5 lakh people in the district every day.
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाचा भर -उपमुख्यमंत्री अजित पवार.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा..
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वंयपूर्ण व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. महानगरासोबतच ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
केंद्र सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होताच जिल्ह्यात रोज दीड लाख नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन
ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्याने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याची गरज
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची सर्वांची जबाबदारी
ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज
ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधायुक्त बळकटीकरणास प्राधान्य
उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच ऑक्सिजनप्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे सर्व सुविधांयुक्त बळकटीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आताही संभाव्य तिस-या लाटेच्या अनुषंगाने ठिकठिकाणी ऑक्सिजन प्लान्टच्या निर्मितीसह स्वतंत्र रुग्णालये, लहान मुलांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था आदी विविध आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, सर्वेक्षण, संपर्क व समन्वयाची साखळी अखंडित राखण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.