हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरला जागतिक योग दिन होणार साजरा

International Day of Yoga आंतराष्ट्रीय योग्य दिन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

World Yoga Day will be celebrated at Hadapsar Gliding Center

हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरला जागतिक योग दिन होणार साजरा

करो योग रहो निरोग

हडपसर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार २१ जूनला हा दिवस साजरा केला जातो.मारुती आबा तुपे  Maruti Aaba Tupe हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

२१ जून २०१५ रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

पंतप्रधान मोदी आणि८४ देशांतील मान्यवरांसह ३५,९८५ लोकांनी नवी दिल्लीतील राजपथ येथे ३५ मिनिटांसाठी २१आसने (योगाची आसने) केली, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा योग वर्ग बनला होता, आणि सहभागी राष्ट्रांमध्ये सर्वात मोठी संख्या—८४—होती.

२१ जून २०२२ रोजी जागतिक योग दिनानिमित्त आपला माणूस आबा तुपे यांच्या ग्लायडिंग सेंटरवर रोज चालू असलेल्या योगा क्लासच्या वतीने हडपसर परिसरातील जास्तीत जास्त योगा ग्रुप एकत्र करून सकाळी ६ ते ७ पर्यंत हा योग प्राणायामचा कार्यक्रम केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने ठरवून दिलेल्या शेड्युलप्रमाणे पार पडणार आहे.

त्यासाठी भेकराईनगर, तुकाई दर्शन काळेपडळ , सत्यपुरम,गोंधळेनगर सातववाडी या भागातील योगसाधना करणारे योगा साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावून हा योगदिन साजरा करु या असे आवाहन आपला माणूस, नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी केले आहे.

यावेळी योग प्रशिक्षक ठरलेल्या अभ्यासक्रमानुसार योग प्राणायाच्या विविध पध्दती, सुर्य नमस्कार असे प्रकार करून घेतील. येताना नेहमीप्रमाणे सतरंजी,मॅट आणि योगाच्या ड्रेसमध्ये वेळेवरच यावे ही विनंती आयोजन व्यवस्थापनाने केली आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *