अभंग-भजन स्पर्धा बंदीजनांसाठी उपयुक्त : प्रशांत पाटील

Participation of inmates of Parbhani Jail in Abhang-Bhajan competition organized by Sharad Krida and Sanskritik Pratishthan शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित अभंग-भजन स्पर्धेत परभणी कारागृहातील बंदीजनांचा सहभाग हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Participation of inmates of Parbhani Jail in the Abhang-Bhajan competition organized by Sharad Krida and Sanskritik Pratishthan

‘चुकलेच राजा तुझे काही काही; मानाने जगलास तू आता मात्र नाही’

अभंग-भजन स्पर्धा बंदीजनांसाठी उपयुक्त : प्रशांत पाटील

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित अभंग-भजन स्पर्धेत परभणी कारागृहातील बंदीजनांचा सहभाग

Participation of inmates of Parbhani Jail in Abhang-Bhajan competition organized by Sharad Krida and Sanskritik Pratishthan शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित अभंग-भजन स्पर्धेत परभणी कारागृहातील बंदीजनांचा सहभाग  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News Hadapsar Latest News
फोटो सौजन्य – सोनल जगताप

परभणी : सुधारणा व पुनर्वसन या दृष्टीकोनातून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने घेतलेली अभंग व भजन स्पर्धा बंदीजनांसाठी अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कारागृह अधीक्षक प्रशांत पाटील यांनी केले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘घेई घेई माझे वाचे नाम विठोबाचे’, ‘मनी नाही भाव देवा मला पाव’, ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ आणि प्रा. ना. सी. कोटकर रचित ‘चुकलेच राजा तुझे काही काही; मानाने जगलास तू आता मात्र नाही’ या रचना सादर केल्या.

कारागृह अधिकारी आर. बी. नरोडे, विठ्ठल सुर्यवंशी तसेच शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संगीत शिक्षक मिलिंद जोशी, जीवन पेडगावकर, प्रा. डॉ. जयंत बाबडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक परिणाम

बंदीजन म्हटले की, त्यांच्याकडे समाजाची पाहण्याची दृष्टी खूप वेगळी असते. बंदीजनांविषयी कडवट भावना असते. स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या कारागृहात जाण्याचा योग आला. त्यावेळी प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, स्पर्धेमुळे बंदीजनांमध्ये सकारात्मक विचार वाढीस लागले आहेत.
लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख

..ही तर विठ्ठल नामाची शक्ती

स्पर्धेत सहभागी झालेला उच्चशिक्षित बंदी निलेश चव्हाण म्हणाला, कारागृहात गेल्या सहा वर्षांपासून आहे. कारागृहात असल्यापासून अशांत होतो. भजन या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे मनाला शांतता मिळत आहे. ही विठ्ठल नामाची शक्ती आहे. संतोष गोंगाणे म्हणाला, कारागृहात आल्यानंतर वेळेचे महत्त्व समजले. भजन स्पर्धेत सहभाग घेतल्याने आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने जगात काही अशक्य नाही याचा साक्षात्कार झाला.

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *