Development of the country is not possible without cyber security – Amit Shah
सायबर सुरक्षेशिवाय देशाचा विकास शक्य नाही – अमित शहा
नवी दिल्ली: सध्याच्या काळात सायबर सुरक्षेशिवाय भारताचा विकास अशक्य आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ‘सायबर सुरक्षा आणि देशाची सुरक्षितता’ या विषयावर दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
सायबर सुरक्षित भारताची निर्मिती ही देशाच्या विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे, भारत हा सर्वच क्षेत्रांत प्रगतीपथावर असून तंत्रज्ञानाचा विकास हा सर्वच पातळ्यांवर वाढला आहे. त्यामुळॆच सायबर सुरक्षा राखणं अत्यंत महत्त्वाचे असून हे खूप मोठं आव्हान देशापुढे आहे, असं ते म्हणाले.
प्रत्येक भारतीयानं स्वतःला तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वापराबाबत सक्षम केलं पाहिजे हे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कायमच ठेवलं आहे, असंही ते म्हणाले. डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे लोकांचं सक्षमीकरण होऊन त्यांच्यात सकारात्मक बदल घडून येत असल्याचं आशादायक चित्र भारतात निर्माण झालं आहे, यावर त्यांनी भर दिला.
हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
hadapsarinfomedia@gmail.com