पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध

Pune Municipal Corporation

Ward-wise voter list published in connection with Pune Municipal Corporation General Election 2022

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी आज गुरुवार, दिनांक २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ( https://www.pmc.gov.in ) तसेच प्रभागाची यादी संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये पाहण्यास उपलब्ध असेल.Pune Municipal Corporation

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी त्यांचे नाव त्यांच्या प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये असल्याची खात्री करावी. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट राज्य यांच्या सूचनेनुसार दिनांक ३१ मे २०२२ रोजी पर्यंतची विधानसभा मतदारयादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कामे राज्य निवडणूक आयोगामार्फत केली जात नाहीत. दिनांक ३१ मे २०२२ रोजीच्या विधानसभा मतदारयादीमध्ये ज्यांची नावे आहेत अशा मतदारांनाच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

सदर प्रारूप मतदारयादी शुद्ध स्वरुपात व त्रुटीविरहीत होण्याच्या दृष्टीने सदर यादीवर हरकती व सूचना मागविण्यात येत असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक २३ जून २०२२ ते १ जुलै २०२२ रोजी सायं. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत असणार आहे.

हरकत / सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे अथवा मुख्य निवडणूक कार्यालय, स्वा. सावरकर भवन, शिवाजीनगर येथे दाखल करता येईल. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखानिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतील. तरी पुणे शहराच्या नागरिकांनी कृपया आपले नाव प्रभागाच्या प्रारूप मतदारयादीमध्ये  असल्याची खातरजमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *