महाविकास आघाडी सरकारमधे तक्रारी किंवा गैरसमज असू शकतील

NCP State President Jayant Patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Mahavikas Aghadi government may have complaints or misunderstandings, but support will remain – Congress and NCP

महाविकास आघाडी सरकारमधे तक्रारी किंवा गैरसमज असू शकतील, तरी पाठिंबा कायम राहील- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली.NCP State President and Water Resources Minister Jayant Patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या बैठकीनंतर पक्षाचे वरीष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील राजकीय घडामोडींना हाताळण्यासाठी शिवसेना जे प्रयत्न करेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल, असं पाटील यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. भाजपा आमदारांची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानी होत आहे.

दरम्यान, शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांच्या नियुक्ती केल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी सादर केलं होतं, त्यावरच्या काही आमदारांच्या सह्यांबाबत प्रशनचिन्ह उपस्थित झालं असून, त्या सर्वांची शहानिशा केली जाईल, असं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार टिकावण्यासाठी प्रयत्नशील- अजित पवार

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार टिकावं यासाठीच प्रयत्नशील आहे, आणि तीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या भूमिकेबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत, आणि आपला पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं.

घटक पक्षांना निधी देतांना आपण कधीही दुजाभाव केला नाही, विकास कामांमध्ये सगळ्यांनाच सहकार्य करण्याची भूमिका राहिली आहे, असं त्यांनी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देतांना सांगितलं. घटक पक्षांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या माध्यमांमध्ये व्यक्त करण्याऐवजी परस्परांसोबतच्या चर्चेत मांडल्या तर गैरसमज दूर होऊ शकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *