There is no reason to impose presidential rule at present – Balasaheb Thorat
राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात
अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत राज्यातल्या विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत असं ते म्हणाले. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत काय करायचं याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
कोणी कुणाच्या नावानं गट तयार केला तरी अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं.
अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – रामदास आठवले
अल्पमतात असल्यामुळे राज्यसरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या कडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं त्यांनी स्पष्टं केलं. शिवसेनेच्या अधिकृत गटनिश्चितीबाबत विधीमंडळानं घटनाविरोधी निर्णय घेऊ नये असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com