बहुमतासाठी भाजपचं राज्यपालांना पत्र

There is no reason to impose presidential rule at present - Balasaheb Thoratहडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

BJP demands a letter to the governor for the majority, in order to submit the majority test.

बहुमतासाठी भाजपचं राज्यपालांना पत्र, बहुमत चाचणी सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले.There is no reason to impose presidential rule at present - Balasaheb Thoratहडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राजकीय भूकंप झाल्यानंतर आता 8 दिवसांनी भाजपची अधिकृतरित्या एण्ट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे (BJP) नेते राज्यपालांना भेटायला गेले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले.

आता राज्यपाल यावर कोणता निर्णय घेतात, तसंच राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी तारीख देणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तिकडे गुवाहाटीमध्येही एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्यानंतर, त्याची तारीख आणि वेळ ठरल्यानंतर बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा सगळा गेम आता राज्यपालांच्या हाती आल्याचं चित्र आहे.

पाठिंबा काढल्याचं पत्र बंडखोर देणार

बंडखोर आमदार उद्या महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पत्र प्रत्यक्षात देण्याऐवजी ई-मेलच्या माध्यमातून देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाला अधिक धार येणार आहे.

बंडखोर आमदारांनी त्यांच्या सह्या असलेले पत्र जर राज्यपालांना दिलं तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. असं जर झालं तर राज्यपाल हे पुढील 24 तासात किंवा 48 तासांमध्ये राज्य सरकारला त्यांची बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात. त्यानंतर मग विधानसभेमध्ये फ्लोअर टेस्ट होईल.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली तर सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हे निश्चित आहे. हाच मुद्दा सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्येही उपस्थित करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असा आदेश दिला. कोर्टाने हा आदेश दिल्यानंतर वकिलांनी मधल्या काळात बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली तर काय करायचं? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना कोर्टाने ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यावर निर्णय कसा द्यायचा म्हणून उत्तर दिलं. तसंच बहुमत चाचणीची परिस्थिती उद्भवली तर पुन्हा कोर्टात या सांगितलं.

शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार : विनायक राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे पत्र प्राप्त झाल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला तशी मुभा दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपात्र ठरविण्याच्या नोटिशींविरोधातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी विश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा आला होता. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर निर्णय होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली होती.

ही सुनावणी झाली तेव्हा विश्वासदर्शक ठरावाचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. असा आदेश दिला तर आमच्याकडे या, असे न्यायालयाने म्हटले होते. यामुळे राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय शिवसेनेपुढे उपलब्ध असेल.

शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय होईपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडण्याची सक्ती करू नये, अशी शिवसेनेची भूमिका असेल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “बहुमतासाठी भाजपचं राज्यपालांना पत्र”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *