चांडोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

Hadapsar Info Media, Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

The admission process of Dr Babasaheb Ambedkar Boy’s Government Hostel at Chandoli begins

चांडोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी खेड तालुक्यातील चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. वसतिगृहात  १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून आता फक्त विद्यालयीन आणि महाविद्यालीन विभागासाठी अर्ज वितरण करण्यात येत आहेत.

या वसतीगृहात इयत्ता ८ वी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि. जा.  भ. ज. इ. मा. व. व खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ मुलांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारी अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुन पांघरुन व दरमहा खर्चासाठी  प्रत्येकी  ५०० रुपयेप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. स्वतंत्र संगणक कक्ष अद्यावत ग्रंथालय यांची सुविधा उपलब्ध आहे.

हे ही अवश्य वाचा
पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात
सामाजिक न्याय विभागातंर्गत शासकीय वसतिगृतहात प्रवेश प्रक्रियेला सुरवात

अधिक माहितीसाठी अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे वसतिगृह अधीक्षक यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण मधील 354 रास्त भाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “चांडोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *