राज्यात पावसाचा जोर वाढला, काही ठिकाणी पूरसदृश स्थिती

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The state received heavy rainfall, with flood-like conditions prevailing in some places

राज्यात पावसाचा जोर वाढला, काही ठिकाणी पूरसदृश स्थिती

मुंबई : राज्याच्या अनेक भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असून काही ठिकाणी पूर किंवा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढचे पाच दिवस कोकण किनारपट्टीवर तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

अमरावतीत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तिवसा शहरालगत वाहणाऱ्या पिंगळाई नदीला पूर आलाय.अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पुरात ३० ते ४० जण अडकले असल्याचं समजतं. बचाव पथक दाखल झाल असून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

हे ही अवश्य वाचा
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात, गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्यानं वाढ झाली आहे. काल सायंकाळी पंचगंगा नदीवरच्या राजाराम बंधाऱ्याची पातळी १६ फुटांवर होती. आज सकाळी सातच्या सुमाराला पंचगंगा नदीची पातळी २४ फुटांपर्यंत गेली होती. एका रात्रीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आठ फुटांची वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.

पंचगंगा नदीवरचे जवळपास पंधरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील बर्कि बंधारा पाण्याखाली गेल्याने पर्यटक अडकले होते. मात्र रात्री उशिरा ते पर्यटक सुखरूपपणे परतले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.

हे ही अवश्य वाचा
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस आजही सुरूच आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १५५ मिलिमीटरच्या सरासरीने ऐकूण १ हजार ३२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात २४० मिलीमीटर एवढा नोंदला गेला.

वेंगुर्ला तालुक्यात सुमारे १९४, सावंतवाडी तालुक्यात १९०, दोडामार्ग तालुक्यात १८७, कणकवली तालुक्यात १४८, मालवण तालुक्यात सुमारे १४६, कुडाळ तालुक्यात सुमारे १३९, तर सर्वात कमी देंवगड तालुक्यात सुमारे ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे. नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सावंतवाडी तालुक्यात तळवडे, कणकवली तालुक्यात खारेपाटण इथल्या बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं होत. छोट्या पुलावर पाणी येत असल्यानं वाहतूक खंडित होत आहे. काही ठिकाणी झाड, गोठे पडून नुकसान झालं आहे.

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे आंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सावित्री, कुंडलिका आदि नद्यांना पूर आले असून पूरस्थितीशी सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.. पोलादपूरजवळ कशेडी घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सुमारे १४४ मिलीमीटर पावसाची नाोंद झाली आहे.

मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे चुनाभट्टी, कुर्ला या भागात ट्रॅकवर पाणी भरायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम हार्बर लोकल सेवेवर होत आहे. मध्य रेल्वेची उपनगरी सेवा 20 ते 30 मिनिटे उशिरानं सुरू आहे.. पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरानं धावत आहे. घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा डोंगर भागात दरडीचा भाग एका घरावर कोसळली. मात्र त्यात जीवित हानी झालेली नाही. माथेरानपेक्षा मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नवी मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत सुमारे १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस कोपरखैरणे विभागात झाला. तिथं सुमारे २२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवाळे गाव, तुर्भे इथल्या शरयू मोटर्स, एपीएमसी परिसरात पाणी साचलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे त्यामुळे सगळीकडे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात सरासरी १०१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. मुदखेड ३८ मिलीमीटर, भोकर ३४ मिलीमीटर, हिमायतनगर २८ मिलीमीटर, अर्धापूर २२ मिलीमीटर , कंधार १६ मिलीमीटर, देगलूर १२ मिलीमीटर नोंदवला गेला आहे.

वाशिम जिल्ह्यात काल रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू कारंजा,मंगरुळपिर, मालेगाव,रिसोड आणि वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून वाशिम ते तामसी गावादरम्यान रस्त्यावर झाड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद आहे. हे झाड विजेच्या तारांवर पडल्यानं ग्रामीण भागातला वीज पुरवठा खंडित झाला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *