प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन

Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi inaugurates All India Education Conference in Varanasi tomorrow

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वाराणसीत अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. शिक्षण मंत्रालय, विद्यापिठ अनुदान आयोग

Prime Minister Narendra Modi
File Photo

आणि बनारस हिंदु विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून ते ती दिवस चालणार आहे.

या संमेलनात सार्वजनिक आणि खाजगी विद्यापिठाचे ३०० हून अधिक कुलगुरु आणि संचालक सहभागी होणार आहेत. या बरोबरच शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते यांच्याबरोबर उद्योजक सहभागी होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या २०२० च्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबतीत या वेळी चर्चा होणार आहे.

ही शिखर परिषद 7 ते 9 जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत होणार आहे. यातील अनेक सत्रांमध्ये बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमता, भारतीय ज्ञान प्रणाली, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, डिजिटल सशक्तीकरण आणि ऑनलाइन शिक्षण, संशोधन, नवोन्मेष, उद्योजकता, गुणवत्ता, मानके आणि मान्यता, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाईल.

आघाडीच्या भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांना (एचईआय) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणे, यशोगाथा आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी आणि अंतर्दृष्टी सामायिक करण्यासाठी ही शिखर परिषद एक व्यासपीठ प्रदान करेल.

या संमेलनाच्या उद्घाटनाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबाई पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित राहाणार आहेत. या संमेलनाच्या निमित्तानं देशातल्या आघाडीच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना आपल्या धोरणात्मक यशाच्या कथा, त्याचप्रमाणे २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतांना आलेले अनुभव सांगता येणार आहेत.
भारताची विस्तारित ध्येयदृष्टी आणि उच्च शिक्षण प्रणालीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी नव्याने वचनबद्धता व्यक्त करणारा वाराणसी करार स्वीकारणे हे अखिल भारतीय शिक्षण समागमचे ठळक वैशिष्ट्य आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *