पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनाला १० लाखांहुन अधिक भाविक

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) पंढरपूर वारी Ashadhi Ekadashi Pandharpur Wari हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

More than 10 lakh devotees visit Vithuraya at Pandharpur

पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनाला १० लाखांहुन अधिक भाविक

पंढरपूर: कालपासून पंढरपूरमध्ये ही पावसाची रिपरिप सुरूच आहे. अशाही पावसात पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी पोहोचत आहे. सगळ्या मानाच्याआषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi)  पंढरपूर वारी  Ashadhi Ekadashi Pandharpur Wari हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News पालख्या या पंढरपूरच्या वेशीवर म्हणजे वाखरी मध्ये पोहोचल्या आहेत. या पालखीसोबत चालणारे वारकरी महत्त्वाचा पंढरपूर मध्ये पोहोचल्यात पंढरपूर मध्ये आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेतात.

येत्या रविवारी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. या निमित्त लाखाे भाविक पंढरपूरातील विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल हाेऊ लागले आहे.

आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. उद्या एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे

आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी बहुसंख्येने भक्त पंढरीत जमा होतात. यावर्षी १० लाखाहुन अधिक भाविक दर्शनासाठी आले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरपूर हे भक्तीरसात आणि विठुनामाच्या जयघोषात न्हाऊन निघताना दिसत आहे.

पालिकेच्या वतीने वाखरी पालखी तळ, वाळवंट, दर्शन रांग याठिकाणी स्वच्छतागृहे उभारली आहेत. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे. आरोग्य सुविधा दिल्या आहेत. नदीपात्रात स्नान करण्यास गेलेल्या भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये. यासाठी जीवरक्षक पथक नदी पात्रात ठेवली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छांसह विशेष संदेश पाठवला आहे. पंढरपुरचं माहात्म्य, तिथली आध्यात्मिक अनुभूती आणि अभिव्यक्ती अलौकिक असून देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरीत आलेल्या भाविकांना शुभेच्छा असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

प्राचीन काळापासून चालत आलेल्या आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याला देशातल्या अत्यंत प्राचीन यात्रांमध्ये महत्वपूर्ण स्थान आहे, मार्ग, पद्धत आणि विचार भिन्न असले तरी आपलं उद्दिष्ट एक असलं पाहिजे ही शिकवण आपल्याला वारीतून मिळते, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

भाविकांना सहज सुलभ दर्शन व्हावे. यासाठी १० पत्र्याच्या शेड तसेच ५ किलो मीटरची लांब रांग पंढरपूर इथं ठेवण्यात आली आहे. सध्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जवळपास ५ तासांचा कालावधी लागतो आहे. दर्शनरांगेत भाविकांना चहा, पाणी आणि भोजनाची व्यवस्था केली असून यासाठी सुमारे १९०० स्वयंसेवक कार्यरत आहेत.

आज मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक मानाच्या वारकरी भक्तांसह पांडुरंगाची शासकीय महापूजा करणार आहेत. सर्वच संतांच्या पालख्या सध्या वाखरीत असून आज रात्री उशिराने पंढरपूरात दाखल होणार आहेत.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नाशिक इथं शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वारकरींच्या रुपात शहरातून वृक्ष दिंडी काढून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. शहराच्या विविध भागातून टाळ, मृदुंग, लेझिम नृत्य, गोल रिंगण अशा विविध माध्यामतून दिंडीद्वारे एकादशी साजरी केली.

आम्ही विद्यार्थी लय भारी, आम्ही करताेय पंढरीची वारी, दुनियाहो निसर्गरम्य सारी, झाडे लावा झाडे जगवा तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे पर्यावरणपूरक संदेश देणारे बॅनर विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपणही केले.

आषाढी एकादशी सोहळ्याची सुरक्षेसाठी ५००० पोलिस तैनात केले असून १५४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *