केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Development of the state will be achieved with the strong support of the Center – Chief Minister Eknath Shinde

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister  Devendra Fadnavis मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राला पुढे नेणारी एकमेव नैसर्गिक युती म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले: “एमव्हीए सरकारच्या काळात आमच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हते आणि म्हणूनच आम्ही पाऊल उचलले. भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युतीच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते.”

भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले: “माझ्या पक्षाने मला आधी मुख्यमंत्री केले. आता पक्षाच्या गरजेनुसार आम्ही पक्षाच्या निर्णयाचे पालन केले आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आणि मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करू. अन्याय दूर झाला आणि आमची नैसर्गिक युती पुन्हा जिवंत झाली.

श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या आणि शनिवारी पहाटेपर्यंत चाललेल्या भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये महाराष्ट्रातील सत्तावाटपाच्या व्यवस्थेवर दीर्घ चर्चा झाल्यानंतर या बैठकी झाल्या.

आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *