महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे

Maharashtra National Law University should be world class: Devendra Fadnavis

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे : देवेंद्र फडणवीस

वसतिगृह व सुविधा केंद्राचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : न्याय विधि क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातून तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यासाठी सहाय्यक ठरावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुलामुलींचे वसतिगृह व सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं  उद्घाटन आाज विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं.

राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस  यांनी दिली आहे.   कायद्याचं राज्य आणि न्याय प्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत  पोहचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नागपूर येथील बुटीबोरी परिसरातील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या सोहळ्यात आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांच्याहस्ते मुलामुलींच्या वेगवेगळ्या वसतिगृहाचे व सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस.नरसिम्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, कुलगुरु प्रोफेसर डॉ.विजेंद्रकुमार, अधिष्ठाता आशिष दीक्षित उपस्थित होते.

या विद्यापीठानं स्वतःच्या जबाबदारीवर तसंच शासनाच्या मदतीनं विद्यापीठाचं  विस्तारीकरण करून या विधी विद्यापीठाला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावं असे आवाहन केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरीत्यांनी यावेळी  केलं. राष्ट्रीय विधि महाविद्यालय निर्मितीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सोबतच्या 2016 च्या  बैठकीपासून सुरू झाली. ज्या पद्धतीने आराखडा तयार करण्यात केला होता त्या पद्धतीची इमारत कालमर्यादेत आज उभी राहिल्याचा आनंद आहे.  नागपूर आता ‘एज्युकेशन हब’ बनत आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या येत आहेत. बुटीबोरी ते कन्हान हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे. या मार्गावर विधि विद्यापीठासाठी विशेष थांबा तयार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आपल्या भाषणात एक नागपूरकर या नात्याने भव्य वास्तू व दर्जेदार शिक्षणाचे केंद्र उभे राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यामध्ये गेल्या पाच वर्षात मदत केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी नामोल्लेख करीत आभार व्यक्त केले.  याप्रसंगी   सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजेंदर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते .

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *