महाराष्ट्र सरकार एमपीएससीशी संबंधित १५००० हून अधिक पदे लवकरात लवकर भरणार.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संबंधित १५००० हून अधिक पदे लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत सांगितले की, एमपीएससी पॅनेलवर उर्वरित सदस्यांची नियुक्ती 31 जुलै पर्यंत होईल. ते म्हणाले की, राज्य सरकारही सध्याच्या पॅनेलमधील सदस्यांची संख्या सध्याच्या सहा वरून 11 किंवा 13 पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे, जेणेकरून मुलाखतीची प्रक्रिया वेगवान होईल.
पुण्याच्या 24 वर्षीय एमपीएससी इच्छुक व्यक्तीने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा घेण्यात विलंब आणि अंतिम मुलाखती हा विषय आज उच्च सदनात मांडला
श्री. पवार यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी एमपी एससी निकाल जाहीर करण्यासाठी ठोस योजना आखली आहे.