राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर

overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Pandit Hariprasad Chaurasia announced State Govt’s Lata Mangeshkar Award

राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर

मुंबई : overnment of Maharashtra logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं कलाक्षेत्रातल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी आतांबर शिराढोणकर यांना तर २०२०-२१ या वर्षासाठी संध्या रमेश माने यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
“पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर तमाशा लोककला पुरस्कार”, “हरिभक्तपरायण शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव कीर्तन अथवा समाजप्रबोधन पुरस्कार” ही दिले जाणार असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कार आणि वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देण्यात येणार असून पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर असे या पुरस्काराचे नाव असणार आहे.
किर्तन/ समाजप्रबोधन पुरस्कार दिला जाणार असून ह.भ.प. शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना आता राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *