मंकीपॉक्स साथीचा उद्रेक आढाव्यानंतर, डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली आणीबाणी

जागतिक आरोग्य संघटना World Health Organization हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

WHO declares Monkeypox as global health emergency amid rising cases

मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर, डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली आणीबाणी

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.जागतिक आरोग्य संघटना World Health Organization हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या रोगाबाबत अत्यंत कमी माहिती असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळेच ही महामारी आणीबाणी घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंकीपॉक्सच्या उद्रेकाचा आढावा घेण्यासाठी या संघटनेनं आयोजित केलेल्या आपत्कालीन समितीच्या दुसऱ्या बैठकीनंतर ही आणीबाणीची घोषणा केली.
बैठकीत सदस्यांमध्ये एकमत झालेले नसतानाही ही घोषणा कली आहे. पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने अशा प्रकारची घोषणा सर्वसहमीला गृहित न धरता केली आहे.

डब्ल्यू एच ओचे महासंचालक टेड्रोस एडानॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संक्रमणामुळं जगभरातल्या ७५ देशांमधले १६ हजारांहून अधिक लोक बाधित झाले असून त्यापैकी ५ जण मृत पावले आहेत.

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ३१ वर्षांच्या एका व्यक्तीला ताप आणि त्वचा विकारामुळे दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा देशातला हा चौथा रुग्ण आहे. तर कुठही प्रवास न करता लागण झालेला हा पहिला रुग्ण आहे. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात  मंकीपॉक्स रुग्णांसाठी वेगळा विभाग सुरू केल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. मंकीपॉक्सचा फैलाव रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचं पथक नेमल्याचंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे –

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर, रुग्णाला ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती ही लक्षणे दिसतात. तापाच्या वेळी अत्यंत खाज सुटणारी पुरळ उठू शकते, जी अनेकदा चेहऱ्यावर सुरू होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. संसर्ग साधारणपणे 14 ते 21 दिवस टिकतो. मंकीपॉक्स विषाणू त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. हे संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव यांना स्पर्श करून प्रसारित होऊ शकतो. संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्याने देखील मंकीपॉक्स होऊ शकतो.

संबंधित बातम्या

मंकीपॉक्स रोगाच्या व्यवस्थापनावर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी
मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “मंकीपॉक्स साथीचा उद्रेक आढाव्यानंतर, डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली आणीबाणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *