फाइव्ह-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात

Prime Minister Modi will launch 5G services tomorrow that will provide high-speed seamless coverage पंतप्रधान मोदी उद्या हाय-स्पीड सीमलेस कव्हरेज देणारी 5G सेवा लॉन्च करणार हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Auction for 5G spectrum begins today

फाइव्ह-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात

20 वर्षांच्या कालावधीसाठी 72,000 MHz पेक्षा जास्त स्पेक्ट्रमचा लिलाव

नवी दिल्ली : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या( 5G Spectrum) लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना ५ जी सेवा पुरवू शकतील.Auction for 5G spectrum begins today फाइव्ह-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

लघू, मध्यम आणि उच्च फ्रिक्वेन्सी बँडसाठी हा लिलाव सुरू आहे. यातून उपलब्ध होणाऱ्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातून दूरसंचार पुरवठादार ५ जी सेवा पुरवतील. यातून मिळणारा इंटरनेट स्पीड सध्याच्या ४ जी सेवेपेक्षा १० पट अधिक असेल, असा दावा आहे.

५ जी सेवेमुळं नवीन उद्योग व्यवसाय सुरू व्हायला मदत होईल तसंच सध्याच्या उद्योगांना व्यवसाय विस्तार करता येईल आणि रोजगारनिर्मितीमध्ये वाढ होईल.

डिजिटल कनेक्टिव्हिटी हा डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांद्वारे सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ब्रॉडबँड, विशेषतः मोबाइल ब्रॉडबँड, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 2015 पासून देशभरात 4G सेवांच्या जलद विस्तारामुळे याला मोठी चालना मिळाली. 2014 मधील दहा कोटी ग्राहकांच्या तुलनेत आज ऐंशी कोटी ग्राहकांना ब्रॉडबँडचा उपयोग झाला आहे.

आगामी 5G सेवांमध्ये नवीन युगातील व्यवसाय निर्माण करण्याची, अतिरिक्त महसूल निर्माण करण्याची क्षमता आहे. उद्योगांसाठी आणि नाविन्यपूर्ण वापर-प्रकरणे आणि तंत्रज्ञानाच्या उपयोजनातून रोजगार प्रदान करणे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *