अकराव्या नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये विद्यापीठातील ईएमआरसीच्या माहितीपटाला नामांकन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Nomination of EMRC’s Documentary in  the 11th National Science Film Festival organized by Vigyan Prasar

विज्ञान प्रसार आयोजित अकराव्या नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये विद्यापीठातील ईएमआरसीच्या माहितीपटाला नामांकन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर (ईएमआरसी) पुणे निर्मित ‘कमला- द स्वदेशी न्यूट्री-इंडियन’ या माहितीपटाला विज्ञान प्रसार आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अकराव्या ‘नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये नामांकन मिळाले आहे.

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसारतर्फे दरवर्षी सायन्स फेस्टिव्हल आयोजित केला जातो. यावर्षी ही स्पर्धा २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान भोपाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

हा माहितीपट डॉ. कमला भागवत सोहोनी यांच्या जीवनावर आधारित आहे, डॉ. कमला या केंब्रिज विद्यापीठातून विज्ञान विषयात पीएच.डी करणार्‍या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांचे संशोधन देशातील लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहार-पोषण
संशोधनाच्या त्या प्रणेत्या आहेत.

या माहितीपटास अनुक्रमे, विज्ञान प्रसार द्वारा आयोजित केलेल्या स्वतंत्रता का विज्ञान फिल्मोत्सव या महोत्सवात द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते तर एनसीईआरटी द्वारे आयोजित केलेल्या २२ व्या ‘चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘बेस्ट रिसर्च’ चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या माहितीपटाचे दिग्दर्शन ईएमआरसीचे माजी संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. यासाठी सहाय्यक दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केले आहे. अजिता देशमुख यांनी संहिता लिहाली आहे तर अप्पा चिंचवडे (कॅमेरा), राम जाधव आणि प्रदिप भोसले (ध्वनी), राजेश देशमुख (सेट) आणि सिलास काकडे, फयाज शेख, खंडू भोसले, विजय काशीद आणि सुनील गायकवाड यांनीही या महितीपटासाठी सहाय्य केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *