गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या

The work of both the Houses of Parliament was disrupted due to the uproar by the opposition on various issues including inflation, the GST rate hike.

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत

महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित

नवी दिल्ली : महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं. सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याबद्दल आपचे खासदार संजय सिंग यांना आज निलंबित करण्यात आलं.

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या
File Photo

संजय सिंग यांनी काल सभागृहात कागद फाडून पीठासनाकडे फेकल्याबद्दल त्यांना या आठवड्याच्या ऊर्वरित भागासाठी निलंबित करावं, असा प्रस्ताव संसदीय कामकाजमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानंतर कामकाज तहकूब झालं. पुन्हा कामकाज सुरु झालं तेव्हा उपाध्यक्ष हरिवंश यांनी वारंवार सांगूनही निलंबित खासदार संजय सिंग यांनी सभागृहातून बाहेर जायला नकार दिला.

गोंधळ सुरुच राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.त्याआधी सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताचं काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी इतर मुद्यांवर दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष  एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला. त्यामुळे सदस्यांनी सभागृहाच्या मधोमध येऊन घोषणाबाजी सुरु केली.

गोंधळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज एका तासासाठी स्थगित केलं होतं. लोकसभेतही आज जी एस टी आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी आणि गोंधळ सुरुच ठेवल्यानं कामकाज बाधित झालं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *