शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा

Uddhav Thackeray and Eknath Shinde उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Senior leader of Shiv Sena Arjun Khotkar supports Shinde group

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबाUddhav Thackeray and Eknath Shinde उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

जालना: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. जालना इथं आज ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.  शिवसेनेतल्या फुटीनंतर खोतकर काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता होती. दिल्लीहून परतल्यावर आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करु असं खोतकर यांनी सांगितलं होतं.

विशिष्ट परिस्थितीमुळे नाईलाज झाल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असून तसं आपण शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनाही कळवलं आहे असं खोतकर म्हणाले. “आज सकाळी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझं या संदर्भात सविस्तर बोलणं झालं. मी माझ्यावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या संदर्भात मी पक्षप्रमुखांच्या कानावर या सर्व गोष्टी टाकल्या.

संजय राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी देखील बोललो आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे, ४० वर्षांपासूनचा आणि घरी आलं की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगून मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि ते मला यासंदर्भात जे काही बोलायचं ते बोलले. त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी एकनाथ शिंदे यांना समर्थन देतो आहे.

यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, “मी जालन्यात माझी भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करेन, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज मी आपल्याशी बोलत आहे. मी १९९० मध्ये शिवसेनेच्यावतीने पहिल्यांदा आमदार झालो आणि आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे, पक्षाची सेवा करत आलो आहे. यामध्ये मी एकटाच नाही तर आमचे सर्व सहकारी आणि सगळ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनचं संघटन वाढवलं आणि ते सामान्य माणासापर्यंत आम्ही ते घेऊन गेलो.

सामान्य माणसाने देखील तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल मी जालना जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. पक्षनेतृत्वाचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की, त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.”

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होतील, असा दावा शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार शुक्रवारी केला होता .

जालना जिल्ह्यातील खोतकर 2014-19 दरम्यान सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची नुकतीच पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदी बढती केली. सत्तार म्हणाले, “खोतकर गोंधळात पडले होते (बंडखोर छावणीत सामील होण्याबद्दल), पण मी त्यांचा गोंधळ दूर केला. आता ते सिल्लोड येथे ३१ जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिबिरात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक बाजार समितीचे सदस्य, आजी-माजी नगरसेवकही शिंदे कॅम्पमध्ये सामील होणार आहेत.”

लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात सेनेने खोतकर यांना उमेदवारी द्यावी या त्यांच्या मागील विधानाबद्दल विचारले असता सत्तार म्हणाले, “आमचा दावा आहे. जालना लोकसभा मतदारसंघ अजूनही आहे. पण दानवे आणि त्यांच्या पक्षाच्या इतर सदस्यांनी याला होकार द्यावा. राज्यातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे.” .

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *