कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वाढ

Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Enhancement of Capabilities of AI Technology

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वाढ

Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News
Image by : commons.wikimedia.org

नवी दिल्‍ली : टाटा सन्सचे अध्यक्ष  एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण उत्पादने विभागाने (डीडीपी) स्थापन केलेल्या कृतीदलाच्या शिफारशीनुसार आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करून आवश्यक मार्गदर्शन आणि संरचनात्मक सहाय्य पुरवण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेची  (DAIC) स्थापना करण्यात आली आहे.  तसेच संरक्षण संघटनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रक्रिया सक्षम करण्यासाठी संरक्षण उत्पादन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प संस्था स्थापन करण्यात आली आहे.

डीआरडीओ मधील प्रकल्प आणि कार्यक्रमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चौकट आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. डीआरडीओच्या सर्व प्रयोगशाळांनी त्यांच्या सर्व उत्पादनांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान गट सुरू केले आहेत.

तसेच, संरक्षण क्षेत्रातील  प्रत्येक सार्वजनिक उपक्रमासाठी (डीपीएसयू) कृत्रिम बुद्धिमत्ता रुपरेषेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या  अंतर्गत 70 संरक्षण विशिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पांपैकी 40 प्रकल्प डीपीएसयूने पूर्ण केले आहेत. तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत:

  • डीआरडीओच्या  तीन समर्पित प्रयोगशाळा आहेत, सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स (CAIR), बंगळुरू आणि डीआरडीओ यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी (DYSL)-AI आणि विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत संशोधनासाठी DYST-CT (कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजी) .
  • CAIR स्टार्ट-अप्सला मदत करत आहे आणि संरक्षण प्रणालींमध्ये एआय संबंधी  कौशल्य संच तयार करण्यासाठी डीआरडीओच्या वैज्ञानिकांसाठी कार्यशाळा देखील आयोजित करते.
  • डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (DIAT) एआय  आणि मशीन लर्निंगमध्ये प्रमाणित अभ्यासक्रम चालवत आहे आणि आतापर्यंत 1000 हून अधिक व्यावसायिकांना या क्षेत्रात  प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  • डीआरडीओच्या डिफेन्स इंडस्ट्री अॅकॅडेमिया सेंटर ऑफ एक्सलेन्स, एक्स्ट्राम्युरल रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड योजनांतर्गत संशोधन आणि विकास प्रकल्पांद्वारे शिक्षण आणि उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन दिले जाते.
  • डीडीपीने सशस्त्र दलांसाठी एआय प्रकल्पांसाठी वार्षिक  100 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.
  • भारतीय हवाई दलाने डिजिटायझेशन ऑटोमेशन, एआय  अॅप नेटवर्किंग (UDAAN) साठी युनिट स्थापन केले आहे जे अभियानांचे  नियोजन आणि विश्लेषण प्रणाली, ई-निरीक्षण इत्यादीसाठी विविध ऍप्लिकेशन  विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

संरक्षण  राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत सुशील कुमार गुप्ता यांना लेखी उत्तरात ही माहिती दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *