लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Celebrating the birth anniversary of Lokshahir Annabhau Sathe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक व जिल्हा कार्यालयाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर शिष्यवृती व प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती संगिता डावखर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती डावखर यांच्याहस्ते संकेत उडाणशिवे इयत्ता 10 वी (95.40 टक्के गुण), कुमारी रचना किरण सोनवणे इयत्ता 12 वी (91.63 टक्के), प्रसाद रामदास कांबळे पदवीधर एम.बी.एस. (64 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर शिष्यवृती व प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. मांजरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून, शाहिरीतून समाज प्रबोधन केल्याचे सांगितले.

कार्यक्रमास नागनाथ उडाणशिवे, सुशांत घनवट, नरेंद्र वाघमारे, श्रीमती प्रणिता बोराडे, दळवी, लहू साळूंके, लक्ष्मण घाडगे, किरण सकट, विवेक चखाले आदी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *