राज्यात मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यानं जनहिताचे आणि अत्यावश्यक निर्णय घ्यायला उशीर

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Due to stalled cabinet expansion in the state, taking public interest and essential decisions is delayed

राज्यात मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यानं जनहिताचे आणि अत्यावश्यक निर्णय घ्यायला उशीर होत असल्याची अजित पवार यांची टीका

मुंबई : राज्याच्या कारभाराचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे एकवटलेले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion )रखडल्याने जनतेच्या हिताचे आणि अत्यावश्यक असणारे निर्णयही घ्यायला उशीर होत आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वार्ताहर परिषदेत केली.

NCP Leader Ajit Pawar Hadapsar Latest News Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

राज्यात नवीन सरकार आल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. राज्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शिंदे सरकारला घेरले आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अनेक फाइल्स पडून आहेत. सगळा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे आहे. अनेक विकासाची कामे रखडली आहेत. मुख्यमंत्र्यांना मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असे पवार म्हणाले.

पूरग्रस्त भागाचा दौरा करुन आल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूरग्रस्त भागातल्या शेतकरी आणि शेतमजूरांची हलाखीच्या स्थिती झाली असल्याचं सांगितलं. केंद्रीय पथकाकडून अद्याप पूरग्रस्त भागाची पहाणी झालेली नाही. फळबागांवर किड पडली आहे, सोया, तूर कापूस या पीकांचं भरून न येणारं नुकसान झालं आहे.

शेतकऱ्यांच्या पशूधनाचंही नुकसान झाल आहे. अश्या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्विकारत फिरत आहेत हे असंवेदनशीलतेचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली. पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवायला प्राधान्य द्यावं, त्या भागातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं.

दुबार पेरणीचं संकट पुढे ठाकलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार आर्थिक सहाय्य करावं, विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी. शेतमजूर आणि शेतकऱ्यांनाही धान्याची मदत करावी अश्य़ा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. आपण या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *