अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रात ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी करणे आवश्यक

Food-Safety-And-Standards-Authority-of-India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Food professionals must register e-mail, mobile phone number in the license certificate

अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रात ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी करणे आवश्यकFood-Safety-And-Standards-Authority-of-India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : एफएसएसएआय, नवी दिल्ली आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या अधिसूचना, परवाना प्रमाणपत्र आदी संबंधी संदेश मिळण्यासाठी अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रामध्ये ऑनलाईनरित्या ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ५ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या अन्न सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अन्न व औषध प्रशासनाकडून हे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) २५ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशानुसार अन्न व्यावसायिकांनी परवाना प्रमाणपत्रामध्ये ऑनलाईनरित्या ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिसूचना, अद्यावत माहिती, सुधारणा नोटीस, परवाना प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी संबंधी संदेश थेट ई-मेल वर व भ्रमणध्वनी क्रमांकावर मिळणार आहेत.

व्यवसायिकांनी ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी अद्यावत करून त्यांचा अन्न सुरक्षा तक्रार प्रणालीमध्ये (एफओएससीओएस) लॉगीनचा पासवर्ड रिसेट करण्याबाबत कार्यपद्धती (एसओपी) तयार केली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अन्न व्यवसाय चालकांनी (एफबीओ) प्रायमरी कॉन्टॅक्ट डिटेल व सेंकडरी कॉन्टॅक्ट डिटेलमधील पासवर्ड रिसेट करण्याकरीता २५ नोव्हेंबर २०२१ च्या परिशिष्ट-II नुसार संबंधित अधिकारी व नोंदणी प्राधिकारी यांच्याकडे स्वतः चा ई-मेल पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध अद्यावत करण्यासाठी विनंती अर्ज किंवा इमेल करावा.

विनंती अर्ज संबंधित व्यावसायिकाच्या लेटर हेडवर वर करावा. त्यावर अधिकृत व्यक्तीची सही असावी. तसेच उचित कारण असावे. अधिकृत व्यक्तीचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी ओळखपत्र तसेच अस्तित्वातील परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, अर्जाची (‘फार्म-बी, फार्म-ए’) प्रत जोडावी.

अधिक माहितीसाठी केवळ https://foscos.fssai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन या कार्यपद्धतीचा उपयोग करुन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *