राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक

National Investigation Agency

Dawood gang accomplice arrested by National Investigation Agency

राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं नाव असून तो दाऊदचा जवळचा साथीदार आहे.National Investigation Agency

सलीम कुरेशीने “डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता व्यवहार आणि विवाद मिटवण्यांमधून शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात सक्रिय भूमिका बजावली,” असा दावा एजन्सीने केला आहे.

तस्करी, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा चलनात आणणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं आणि एलईटी, जेएम आणि अल कायदासोबत काम करण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभारणं तसंच मालमत्ता व्यवहाराद्वारे छोटा शकीलच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात त्याचा सहभाग होता.

3 फेब्रुवारी रोजी “दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवाया”, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांद्वारे तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, बनावट चलन प्रसारित करणे, दहशतवादी निधी उभारणे आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या सक्रिय सहकार्याने काम करणे संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असे राष्ट्रीय तपास संस्थेनं( National Investigation Agency) म्हटले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *