भारताचा बौद्ध सांस्कृतिक वारसा: नवीन पुरातत्त्वीय शोध या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

International Conference on Buddhist Cultural Heritage of India: New Archaeological Discoveries on 11th to 13th August

भारताचा बौद्ध सांस्कृतिक वारसा: नवीन पुरातत्त्वीय शोध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद दि. ११ ते १३ ऑगस्ट

पुणे : एकोणिसाव्या शतकापासून पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या पुरातत्त्वीय शोध आणि उत्खननामुळे स्तूप, विहार, चैत्यगृह, शिल्पांचे अवशेष या स्वरूपातील प्राचीन बौद्ध मूर्त बौद्ध वारसा आपल्यासमोर आला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

गेल्या तीन दशकांत, भारतातील अनेक बौद्ध पुरातत्त्वीय अवशेषांचे नव्याने शोध लागले आहेत. या शोधांमुळे प्राचीन भारतीय बौद्ध धर्म आणि त्याच्या अनेक पैलूंबद्दलचे आपले सध्याचे ज्ञान समृद्ध होण्यास मदत होणार आहे. भारतीय संस्कृतीचे परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी हे नवीन शोध जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातर्फे “भारताचा बौद्ध सांस्कृतिक वारसा: नवीन पुरातत्त्वीय शोध” या विषयावर ११ ते १३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत सकाळी ९.०० ते सा. ६.१५ या दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतात नव्याने सापडलेल्या बौद्ध वारसा स्थळांचे महत्त्व समजून घेणे आणि प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका जाणून घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेत सुमारे ३० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधक आपले संशोधन उपस्थितांसमोर सादर करणार आहेत. इच्छुकांनी Google फॉर्म व नोंदणी शुल्क भरून नावनोंदणी करावी.

लागू नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे आहेतः
भारतीय विद्यार्थी: ₹ २००
भारतीय प्राध्यापक आणि इतर सहभागी: ₹ ५००
परदेशी आणि अनिवासी भारतीय: $ १०
केवळ नोंदणीकृत सहभागींनाच परिषदेसाठी ऑनलाइन प्रवेश दिला जाणार असून किमान ८०% उपस्थिती असलेल्यांना उपस्थितीचे प्रमाणपत्र मिळेल.
नोंदणी करण्यासाठी, कृपया खालील लिंकवर क्लिक करून Google फॉर्म भरा:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe-__4Ea8Lmn0yHdZYkWpU69GxrVmIneU6nR3jZ4PL8a5PxDw/viewform?usp=pp_url

नोंदणीकृत सहभागींना नोंदणी शुल्क भरण्यासाठीचा तपशील/लिंक ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *