स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मिळ स्टॅम्प पेपर्सचे विद्यापीठ मुख्य इमारतीत प्रदर्शन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Exhibition of rare stamp papers from pre-independence institutions on 13th and 15th August at University Main Building

स्वातंत्र्यपूर्व संस्थानांमधील दुर्मिळ स्टॅम्प पेपर्सचे १३ व १५ ऑगस्ट रोजी विद्यापीठ मुख्य इमारतीत प्रदर्शन

श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यापीठ वारसा सहल समितीमार्फत राजकुमार खुरपे यांच्या अनोख्या संग्रहातील दुर्मिळ अशा निवडक संस्थानांमधील स्टॅम्प पेपरचं प्रदर्शन आयोजित केलं जात आहे.

Savitribai Phule Pune Universiy
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील इतिहासविषयक संग्रहालयात हे प्रदर्शन आयोजित केलं जाईल. दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.कारभारी काळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार उपस्थित राहणार आहेत.

दि. १३ आणि दि. १५ ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन सुरू राहील. प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते १ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशी आहे. विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन मुख्य इमारतीमध्ये हे प्रदर्शन पहिल्या मजल्यावरील इतिहासविषयक संग्रहालयात दोनही दिवस सर्वसामान्यांसाठी खुलं राहील.

याबाबत माहिती देताना इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.श्रद्धा कुंभोजकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत देशात जसं मोठ्या भूप्रदेशावर इंग्रजांचं राज्य होतं, तसंच बऱ्याच मोठ्या भूप्रदेशांवर इंग्रजांचे मांडलिक असणाऱ्या संस्थानिकांचं राज्य होतं. संस्थानांच्या राज्यकर्त्यांची वैशिष्ट्यं स्पष्ट करणारे असे नोंदणीचे दस्त म्हणजे स्टॅम्प पेपर संस्थानांतर्फे छापले जात. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या संस्थानांमधल्या प्रजाजनांनी कोणतेही करार केले, वस्तू विकल्या, खरेदी केल्या, गहाण ठेवल्या तर त्याची नोंद या स्टॅम्प पेपरवरच केली जात असे. त्यामुळे स्टॅम्प पेपर हे आधुनिक भारतीय इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.

संस्थानांमधील स्टॅम्प पेपरचं महत्त्व जाणणारे अनेक संग्राहक असतात. जयसिंगपूरमधील राजकुमार खुरपे हे असेच इतिहासप्रेमी संग्राहक आहेत. गेल्या २० वर्षांमध्ये विविध २०० संस्थानांच्या सुमारे १५०० स्टॅम्प पेपरचा संग्रह त्यांनी केलेला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये भारतातल्या २०० संस्थानिकांचे स्टॅम्प पेपर सुव्यवस्थितपणे ठेवलेले आहेत.

खुरपे यांच्याकडून या अनोख्या संग्रहाबद्दलची माहिती ऐकण्याची संधी या निमित्ताने सर्व नागरिकांना मिळणार आहे.

तसेच नेहमीप्रमाणे १३ ऑगस्ट या दुसऱ्या शनिवारी विद्यापीठ मुख्य इमारतीची वारसा सहल आयोजित केली जाईल. त्यासाठी नागरिकांनी सकाळी ११ वाजता द. वा पोतदार संकुल येथे उपस्थित रहावे, असेही डॉ.कुंभोजकर यांनी सांगितले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *