वेगवेगळ्या विभागांनी एकत्र ऐतिहासिक दस्तावेजांवर काम करावे

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Different departments should work together on historical documents

वेगवेगळ्या विभागांनी एकत्र ऐतिहासिक दस्तावेजांवर काम करावे : श्रावण हर्डीकर

दुर्मिळ मुद्रांकांचे विद्यापीठात प्रदर्शन

पुणे : आजही अनेक विभागांकडे, अनेक व्यक्तींकडे दुर्मिळ दस्तऐवज आहेत अशा ऐतिहासिक दस्तऐवजांवर संशोधन व्हावे असे मत राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वारसा सहल समितीतर्फे दुर्मिळ मुद्रांक (स्टॅम्प पेपर) चे प्रदर्शन विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील मार्बल हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्रावण हर्डीकर बोलत होते.

विद्यापीठाने अशा दस्तऐवजांचे कायमस्वरूपी दालन उभे केले असून ते वारसा सहलीच्या निमित्ताने सर्वांना खुले असते. भविष्यात यात आणखी संशोधन आणि दुर्मिळ संग्रह करण्याचा आमचा मानस आहे. ज्यांच्याकडे असा दुर्मिळ संग्रह आहे अशा व्यक्तींनी इतिहास विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून भविष्यात यावर आणखी काम करणे शक्य होईल.

 

डॉ.कारभारी काळे, कुलगुरु
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

जयसिंगपूर मधील राजकुमार खुरपे यांनी २० वर्षामध्ये विविध २०० संस्थानाच्या सुमारे १५०० मुद्रांकांचा संग्रह केला आहे. यातील काही निवडक मुद्रांकांचे प्रदर्शन विद्यापीठात भरविण्यात आले आहे. नागरिकांना १५ ऑगस्टच्या दिवशी हे प्रदर्शन पाहता येईल.

यावेळी हर्डीकर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वारसा सहल समितीने भरलेले प्रदर्शन स्तुत्य असून इतिहासाची माहिती देणारे आहे. यासाठी भविष्यात आवश्यक ती मदत मुद्रांक विभागाकडून करण्यात येईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *