नक्षलग्रस्त भागात राज्य सरकार भारत बटालियन-४ ची स्थापना करणार

Sudhir Mungantivar BJP Leader हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The state government will set up India Battalion-4 to strengthen the police force in Naxal-affected areas

नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार भारत बटालियन-४ ची स्थापना करणार

चंद्रपुरा : नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-४ ची स्थापना केली जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात ध्वजारोहणानंतर दिली आहे.

Sudhir Mungantivar BJP Leader हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

याबाबतचा निर्णय झाला असून, यासाठी एक हजार सात पदांना मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. ही बटालियन चंद्रपूर,गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये कार्यरत असेल, आणि या बटालियनमध्ये प्रामुख्यानं या जिल्ह्यातल्या युवकांना प्राधान्य दिलं जाईल.

जेव्हा-केव्हा पोलिसांना तातडीच्या मदतीची गरज असेल, तेव्हा ही बटालियन त्या त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. बटालियनच्या मुख्यालयासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कोर्टी मक्ता इथं जागा मंजूर केली आहे, आता पुढची प्रक्रिया लवकरच सुरु होईल असंही ते म्हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *