स्वदेशी बनावटीची उपकरणे आणि प्रणाली नवी दिल्लीत भारतीय लष्कराला सुपूर्द

Raksha Mantri-Rajnath Singh हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Indigenously manufactured equipment and systems were handed over to the Indian Army in New Delhi

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्वदेशी बनावटीची उपकरणे आणि प्रणाली आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराला केली सुपूर्द

या प्रणालींमुळे संरक्षण सज्जता वाढीला लागेल- राजनाथ सिंह

लष्कराला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सहाय्य होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज 16 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीत स्वदेशी बनावटीची उपकरण आणि प्रणाली भारतीय लष्कराला सुपूर्द केली. यात, एफ आय एन एस ए एस, मानव-रोधी आधुनिक भूसुरुंग ‘निपुण’, खडकाळ पृष्ठभागासाठी वाढीव क्षमता असलेली स्वयंचलित संवाद प्रणाली, रणगाड्यांमध्ये उच्च श्रेणीची दृष्टी प्रणाली, थर्मल इमेजर, अत्याधुनिक वेगवान पायदळ, सुरक्षा वाहने आणि हल्लेखोर बोटीचा यात समावेश आहे.

Defense Minister Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

सीमारेषेवर तैनात जवानांना कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्र्यांनी ही उपकरणे लष्कराकडे सुपूर्द केली आहेत. ही उपकरण प्रणाली भारतीय लष्कर, संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तसंच उद्योग जगत यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही उपकरणे आणि प्रणालीमुळे भारतीय लष्कराची युद्धजन्य सुसज्जता वाढीस लागेल तसंच कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या वाढत्या स्वयंपूर्ण क्षमतेचे हे लखलखते उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खाजगी क्षेत्र आणि इतर संस्थांच्या माध्यमातून संरक्षण दलाच्या पायाभूत सुविधाच्या गरजांमध्ये बदलत्या वेळेनुसार वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यकालीन आव्हानांचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करणे आवश्यक असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

संरक्षण दलांनी अलौकिक कामगिरी करत राष्ट्र उभारणीसाठी कायम समर्पित राहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. हस्तचलित थर्मल इमेजर, टी 90 रणगाड्यांसाठी कमांडर थर्मल इमेजिंग साईट, रेकॉर्डिंग सुविधा असलेली जमिनीशी जोडलेली यंत्रणा, स्वयंचलित देवाण-घेवाण प्रणाली एम के टू, उच्च श्रेणीची रेडिओ संदेशवहन यंत्रणा, सौरऊर्जेवर चालणारे प्रकल्प, आक्रमण करणारी विमान, स्वयंचलित यंत्रणेसह हवाई प्रणाली, पायदळ सुरक्षा वेगवान वाहने आणि जलद प्रतिसाद देणारी लढाऊ वाहने यांचाही यात समावेश आहे.

युद्धजन्य प्रशिक्षण, प्रशासकीय तसंच मनोरंजनात्मक सेवांसाठी निवासी सेवा पुरवण्याच्या हेतूने अधिकृत उभारणी सेवेचाही सिंग यांनी शुभारंभ केला. एमईएस अर्थात लष्करी अभियंता सेवेत पारदर्शकता आणून कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने आणि गुप्त सेवा सुविधा वाढण्याच्या दृष्टीने अनेक ई-सुशासन सेवांचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *