वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या काळात सर्व विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधत महाराष्ट्राला पुढे न्यावे

Governor Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

In the era of rapidly changing technology, all the universities should coordinate with each other and take Maharashtra forward

वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या काळात सर्व विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधत महाराष्ट्राला पुढे न्यावे : भगतसिंह कोश्यारी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : दिवसागणिक तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, अशा स्थितीत काळासोबत राहण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांनी एकमेकांशी समन्वय साधावा व महाराष्ट्राला पुढे न्यावे असे मत राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Governor Bhagat Singh Koshyari राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन व हस्तांतरण भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कोश्यारी म्हणाले, तंत्रशास्त्र किंवा आरोग्यसारख्या एखाद्या विशेष शाखेच्या विद्यापीठाची निर्मिती त्या क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रम राबविण्यासाठी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रादेशिक केंद्राच्या माध्यमातून इतर विद्यापीठांशी जोडलेल्या शैक्षणिक संस्थांना लाभ होईल.

डॉ.कारभारी काळे म्हणाले, डॉ.आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना २०१४ आली करण्यात आली. महाराष्ट्रात नागपूर, औरंगाबाद येथे विद्यापीठाचे प्रादेशिक कार्यालय सुरू असून आज पुण्यातही त्याची सुरुवात झाली आहे. मुंबईचे केंद्रही लवकरच सुरू केले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७ हजार ५०० चौरस फुटाचे कार्यालय उपलब्ध करून दिल्याने मी विद्यापीठाच्या सर्व घटकांचे आभार मानतो. यावेळी डॉ.काळे यांनी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.

प्रास्ताविकपर भाषणात राजेश पांडे म्हणाले, विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृषटिकोनातूनच उपकेंद्र हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू झालेल्या या प्रादेशिक कार्यालयामुळे विद्यापीठाला नक्कीच फायदा होईल. उपस्थितांचे आभार डॉ.भगवान जोगी यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *