‘बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Calling for applications for Research Fellowship from M.Phil, PhD students through ‘Barti’

‘बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधनडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षिक आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.डी (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे

अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *