Edible oil manufacturers, packers and importers to declare net weight and density of oil without temperature – Central Govt.
खाद्यतेल उत्पादक, पॅकिंग करणारे आणि आयातदारांनी तापमानाशिवाय तेलाचे निव्वळ प्रमाण आणि घनतेप्रमाणे वजन घोषित करावं – केंद्र सरकार
नवी दिल्ली : खाद्यतेल उत्पादक/ पॅकर्स/ आयातदार यांनी खाद्यतेल आणि इतर तत्सम पदार्थावरील निव्वळ प्रमाण, आणि घनतेप्रमाणे वजन घोषित करण्याबरोबरच
तापमानाशिवाय आकारमान घोषित करावे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं त्यांना उत्पादनाच्या वजनासह तापमानाचा उल्लेख न करता निव्वळ प्रमाण घोषित करण्याच्या त्यांच्या लेबलिंगमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. तशा प्रकारचे लेबलिंग, प्रस्तूत निर्देश जारी केलेल्या तारखेच्या सहा महिन्यांच्या आत म्हणजे 15 जानेवारी, 2023 पर्यंत दुरूस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 अंतर्गत, ग्राहकांच्या हितासाठी सर्व प्री-पॅकेज केलेल्या वस्तूंवर इतर घोषित माहितीशिवाय वजनाच्या मानक प्रमाणाच्या संदर्भामध्ये निव्वळ प्रमाण घोषित करणे किंवा मोजमाप नमूद करणे अनिवार्य आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.co