शिक्षक राष्ट्र घडवण्याचे काम करतात

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Teachers work to build a nation.

शिक्षक राष्ट्र घडवण्याचे काम करतात :

विद्यासागर जी.बी माजी सहसचिव रयत शिक्षण संस्था सातारा

हडपसर : शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची प्रेरणा देतात. योग्य दिशा दाखवून यशाच्या शिखरापर्यंत नेतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे दीपस्तंभअसतात.प्रत्येक शिक्षक राष्ट्र घडवण्याचे काम करतात. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव विद्यासागर जी.बी. यांनी केले.साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

साधना विद्यालय व आर.आर. शिंदे ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर संस्थेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने आयोजित सेवापूर्ती व सत्कार समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन साधना विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव दत्तात्रय जाधव, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य चंद्रकांत वाव्हळ ,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,आजीव सभासद रोकडे जे.एस.,आजीव सभासद लालासाहेब खलाटे, सविता क्षीरसागर,माजी सभापती अशोकराव मोरे, पुणे रेल्वे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत क्षीरसागर,नांदेड सिटी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निलेशजी पांडे ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रायकर, अशोकराव तुपे , खडकवासला विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, समन्वय समिती सदस्य विजय शितोळे,पुणे परिवहन विभागातील रवींद्र राऊत,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राऊत,माजी विद्यार्थी यशवंत दांगट,किशोर पोकळे,मलठण गावचे सरपंच प्रकाश गायकवाड,प्राचार्य अनिल शिंदे, गफारखान पठाण, साधना संकुलातील सर्व शाखाप्रमुख, सर्व रयत सेवक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शशांक क्षीरसागर,सविता क्षीरसागर,सचिन शिंदे,रवींद्र भोसले ,अमरजा कांबळे यांनी सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.सूत्रसंचालन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले. तर आभार शिवाजी मोहिते यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *