जीआयएस सक्षम लँड बँकला मिळत आहे लोकप्रियता.

India-Industrial-Land-Bank

जीआयएस सक्षम लँड बँकला मिळत आहे लोकप्रियता; संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांमध्ये एप्रिल 2021 पासून प्रत्येक महिन्यामध्ये 30% वाढ.

India-Industrial-Land-Bank
India Industrial Land Bank

इंडिया इंडस्ट्रियल लँड बँक (आयआयएलबी) एक जीआयएस-आधारित पोर्टल आहे जे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रा, नैसर्गिक संसाधने आणि भूभाग, रिक्त भूखंडांवरील भूखंड -स्तरीय माहिती, उपक्रमांचा मार्ग आणि संपर्काची माहिती इत्यादी  सर्व औद्योगिक पायाभूत सुविधांशी संबंधित माहितीचे भांडार आहे. सध्या आयआयएलबीकडे 5.5 लाख हेक्टर क्षेत्रावर अंदाजे 4000 औद्योगिक पार्क तयार करण्यात आले आहेत आणि ते दूरस्थपणे जमीन शोधण्यासाठी गुंतवणूकदारांना निर्णय आधार म्हणून काम करतात. रिअल-टाइम आधारावर अद्ययावत केलेल्या पोर्टलवर तपशील देण्यासाठी ही प्रणाली 17 राज्यांच्या उद्योग-आधारित जीआयएस प्रणालीशी जोडली गेली आहे आणि डिसेंबर 2021 पर्यंत ती देशभरात जोडली जाईल.

एक मोबाइल अनुप्रयोग (ज्यामध्ये लॉगिन आवश्यक नाही) Android आणि iOS स्टोअरवर लाँच केले गेले. लवकरच अतिरिक्त वैशिष्ट्ये सादर केली जातील. त्याचबरोबरीने वापरकर्त्यांना कोणत्याही लॉगिनशिवाय पोर्टल वापरण्याची परवानगी देऊन पोर्टल अधिक वापरकर्ता अनुकूल बनविले गेले आहे. वापरकर्त्याच्या अधिक चांगल्या अनुभवासाठी पोर्टलचे डिझाइन आणि यूआय सतत सुधारित केले जात आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या मुख्यपृष्ठाद्वारे देखील लँड बँकेची माहिती उपलब्ध आहे. औद्योगिक माहिती प्रणालीवर क्लिक केल्यावर गुंतवणूकदारांच्या तपशीलवार प्रवेशासाठी पृष्ठास https://iis.ncog.gov.in/parks/login1 वर पुनर्निर्देशित केले जाईल. याव्यतिरिक्त, लँड बॅंकेसंबंधी माहिती इंडिया इन्स्टस्ट्रियल लँड बँक म्हणून रिसोर्स टॅब अंतर्गत इन्व्हेस्ट इंडिया संकेतस्थळावर देखील प्राप्त होऊ शकते.

संकेतस्थळ वापरकर्त्यांच्या संख्येत एप्रिल 2021 पासून प्रत्येक महिन्यामध्ये 30% वाढ झाली आहे आणि मे 2021 मधील 44136 वापरकर्ते आणि एप्रिल 2021 मधील 30153 वापरकर्ते यांच्या तुलनेत जूनमध्ये 55000 जणांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. मागील तिमाहीत (एप्रिल – जून 2021) एकूण वापरकर्ते 13,610 होते ज्यांपैकी 12,996 असे आगळेवेगळे वापरकर्ते होते ज्यांनी अंदाजे 1.3 लाख पृष्ठ बघितली.

देशानुसार संकेतस्थळ बघणाऱ्यांमध्ये, भारतानंतर, अमेरिकेतील वापरकर्ते सर्वाधिक आहेत. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर, युएई, जर्मनी आणि इंडोनेशियाचा समावेश आहे. इंडस्ट्री असोसिएशन, सिंगापूर इंडियन हाय कमिशन, कोरीयाचे भारतीय दूतावास, कोट्रा आणि मलेशियन व कोरियन गुंतवणूकदारांना आयआयएलबी पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन चे प्रात्यक्षिक विविध कार्यक्रमाद्वारे देण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *