वस्तू किंवा सेवेच्या नावाखाली मूळ उत्पादनाची फसवी जाहिरात करण्यावरही बंदी

Fraudulently advertising the original product under the guise of a good or service is also prohibited

वस्तू किंवा सेवेच्या नावाखाली मूळ उत्पादनाची फसवी जाहिरात करण्यावरही बंदी

नवी दिल्ली : कोणत्याही वस्तू अथवा सेवेची जाहिरात करायला कायद्याने बंदी असली तर इतर वस्तू किंवा सेवेच्या नावाखाली मूळ उत्पादनाची फसवी जाहिरात करण्यावरही बंदी असेल असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

मंत्रालयानं यासंदर्भात कठोर दिशानिर्देश जारी केले असून त्यांचं उल्लंघन झालं तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. अलिकडेच काही क्रीडास्पर्धांच्या प्रसारणात सोडा किंवा पॅकबंद पाण्याच्या नावाखाली मद्यार्काच्या तसंच मुखवासाच्या नावाखाली तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहिराती दाखवल्या गेल्याचं आढळल्यामुळे हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

हे दिशानिर्देश कारखानदार, उत्पादक, सेवा पुरवठादार आणि जाहिरातदारांना लागू असल्याचं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *