संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण

Launching of INS Vikrant aircraft carrier by the Prime Minister संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Launching of INS Vikrant aircraft carrier by the Prime Minister

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण

  • आयएनएस विक्रांतच्या जलावतरणामुळे थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात वाढ- मुख्यमंत्री
  • आयएनएस विक्रांत विषयी
  • नौदलाचे नवे निशाण (ध्वज)

कोची: आयएनएस विक्रांत ही देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नौदलात सामिल करण्यात आली. आयएनएस विक्रांतवर आयोजित हा कार्यक्रम म्हणजे जागतिक पटलावर उदयाला येत असलेल्या भारताच्या दिमाखदार कामगिरीला मानवंदना असून, प्रत्येक भारतीय आज नव्या भविष्यकाळाच्या उदयाचा साक्षीदार असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. Launching of INS Vikrant aircraft carrier by the Prime Minister संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

दूरवर असलेली उद्दिष्ट, दूरचा प्रवास, कधी न संपणारी आव्हानं आणि अथांग सागर यावर ‘विक्रांत’ हे भारताचं उत्तर असून, ते भारताच्या स्वयंपूर्णतेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. विक्रांत युद्धनौकेच्या प्रचंड विस्ताराचं वर्णन करताना ते म्हणाले की ही नौका एखाद्या तरंगत्या शहराप्रमाणे आहे. ही नौका ५ हजार कुटुंबाना पुरेल इतक्या विजेची निर्मिती करत असून या नौकेत वापरलेल्या तारांची लांबी कोची ते काशी इतकी लांब होऊ शकते, असं ते म्हणाले.

विक्रांत युद्धनौका जेव्हा सेवेत दाखल होईल, तेव्हा नौदलाच्या अनेक महिला सैनिकांची त्यावर नियुक्ती होईल. सागराच्या सक्षम लाटांना बंधन नसतं, तसंच देशाच्या कन्यांना देखील यापुढे कुठल्याही क्षेत्रात येण्यापासून रोखलं जाणार नाही असं ते म्हणाले.

आयएनएस विक्रांतचं नेतृत्त्व कमांडिंग ऑफिसर कॅप्टन विद्याधर हरके यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले असून यापूर्वी त्यांनी आयएनएस जलाश्व चं नेतृत्व केलं आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी नौदलाच्या नव्या निशाणाचंही अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आला आहे.

आयएनएस विक्रांतच्या जलावतरणामुळे थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात वाढ- मुख्यमंत्री

आयएनएस विक्रांतच्या जलावतरणामुळे थल-जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणखी वाढलं असून, आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना हे अभिवादन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं विक्रांत युद्धनौकेचं जलावतरण आणि भारतीय नौदलाचा  नवीन ध्वज प्रदान सोहळा हा भारतीय संरक्षण क्षेत्रातला सुवर्ण क्षण असून, त्याबद्दल भारतीय नौदलाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरची पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीनं सागरी सुरक्षा आणि नौदलाची पहिल्यांदा निर्मिती केली होती.त्या गौरवशाली इतिहासाचं स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

आयएनएस विक्रांत विषयी

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे

262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद असलेल्या  विक्रांतचे वजन सुमारे 43,000 टन इतके आहे. याचा कमाल वेग 28 नॉट इतका असून, इंजिनाची  कमाल क्षमता 7,500 नॉटिकल मैल इतकी आहे. ह्या जहाजावर 2200 कंपार्टमेंट्स असून 1600 कर्मचाऱ्यांची- ज्यात महिला अधिकारी आणि खलाशी   यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही विमानवाहू नौका, अत्यंत उच्च दर्जाच्या मशीनरी चालवणाऱ्या, दिशादर्शक आणि स्वयंसंरक्षित अशा स्वयंचलित यंत्रणेने युक्त आहे. त्यावर अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा लावल्या आहेत.

मिग- 29, के लढाऊ जेट, कमोव्ह-31, MH-60R- ही लढावू विमाने ,बहुपयोगी हेलिकॉप्टर्स – अशी 30 विमानं तैनात आणि कार्यरत असण्याची या नौकेवर  क्षमता आहे. त्याशिवाय, देशी बनावटीचे, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, आणि हलक्या वजनाची लढावू विमाने देखील इथून हालचाली करु शकतात. शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) ही नवी लढावू विमान संचलन व्यवस्था वापरण्यास सक्षम, असे विक्रांत, स्की-जंप सुविधेने युक्त आहे. तसेच, “अरेस्टर वायर्सचा संच यात आहे.

नौदलाचे नवे निशाण (ध्वज)

भारताच्या वसाहतवादी गुलामीच्या खुणा पूसून टाकण्याच्या संकल्पाला अनुसरून, भारतीय नौदलाच्या ध्वजाचे नव्याने आरेखन करुन, त्यात भारताच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा चिन्हांकित करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार, पांढरे निशाण, असलेल्या नौदलाच्या झेंड्यावर आता, दोन महत्वाचे घटक असतील- एक डावीकडे वर आपला तिरंगा ध्वज आणि नेव्ही ब्लू-म्हणजे गडद निळ्या रंगाचा – भोवती सुवर्ण अष्टकोन असलेली मुद्रा ध्वजदंडाच्या दुसऱ्या बाजूला मध्यभागी असेल. ह्या सुवर्ण अष्टकोनाच्या आत, अशोक स्तंभ हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे, तिथेच देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. त्याखाली, जहाजाचा नांगर आहे. त्याच्या खाली – ‘शं नो वरुण:’(वरुण देवाची आमच्यावर कृपा असावी) हे नौदलाचे बोधवाक्य सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *