मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचं लक्ष्य दीडशे जागांचं असेल

Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

BJP’s target will be 150 seats in Mumbai Municipal Corporation elections – Amit Shah

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचं लक्ष्य दीडशे जागांचं असेल – अमित शहा

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती

Home Minister Amit Shah गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचं दीडशे जागांचं लक्ष्य असून, मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

ते आज आपल्या मुंबई दौऱ्यात  भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मुंबईत राजकारणावर केवळ भाजपाचं वर्चस्व असायला हवं, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मैदानात उतरून काम करायला हवं, असं ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेनं आपला विश्वासघात केला असून, विश्वासघात करणाऱ्यांना कुठलीही माफी नसल्याचं ते म्हणाले. त्यापूर्वी सकाळी अमित शहा यांनी लालबागचा राजा आणि वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

देशाने ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ चा अवलंब केला असून या धोरणामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होईल. असे मत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. श्री. शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन आज करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार पूनम महाजनखासदार मनोज कोटकएल अँड टी चे अध्यक्ष ए.एम नाईकसीईओ एस.एम. सुब्रमण्यमचेरिटेबल ट्रस्टचे जिग्नेश नाईकप्राचार्य मधुरा फडकेशिक्षक आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेउच्च व तंत्र आणि संसदीय कार्य मंत्री चंदकांत पाटीलशालेय शिक्षण मंत्री गिरीष महाजनवने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार चंद्रशेखर बावनकुळेआमदार आशिष शेलारआमदार प्रवीण दरेकरआमदार संजय कुटेआमदार श्रीकांत भारतीयमाजी मंत्री विनोद तावडेपोलीस महासंचालकमुंबई पोलीस आयुक्तराजशिष्टाचार विभागातील अधिकारीउपनगरच्या जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *