भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये ४६ व्या क्रमांकावर

Prime Minister Narendra Modi

Prime Minister himself asserted that India is ranked 46th in the latest global list

भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये ४६ व्या क्रमांकावर असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

अहमदाबाद : सरकार विज्ञान आधारित विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असून सरकारच्या या प्रयत्नांमुळे भारत जागतिक नवीनतम सूचीमध्ये ४६ व्या क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल आहे.

Prime Minister Narendra Modi
File Photo

सायन्स सिटी, अहमदाबाद इथं दोन दिवसीय केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. २०१४ पासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. या अमृत काळात भारताला संशोधन आणि नवोपक्रमाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सर्वांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावं लागेल.

श्री. मोदींनी राज्यांना शास्त्रज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यास सांगितले आणि राज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांच्या उभारणीवर जोर दिला. ते म्हणाले की, राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थांमध्येही इनोव्हेशन लॅबची संख्या वाढवली पाहिजे. वैज्ञानिक संशोधन तळागाळापर्यंत नेण्याची आणि स्थानिक समस्यांवर विज्ञानावर आधारित उपाय शोधण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन स्थानिक पातळीवर नेण्याची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

त्यांनी राज्य सरकारांना अधिकाधिक वैज्ञानिक संस्थांच्या निर्मितीवर आणि प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थांमध्येही नवीनतम प्रयोगशाळांची संख्या वाढवायला हवी, असं मोदी म्हणाले. त्यांनी देशवासियांना शास्त्रज्ञांचं यश मोठ्या उत्साहात साजरे करण्याची विनंती केली. आजचा नवा भारत, “जय जवान जय किसान” “जय विज्ञान आणि जय अनुसंधान” या मंत्राने पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितूभाई वाघानी आणि गुजरात सरकारचे प्रधान सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र राज्य समन्वय आणि सहयोग यंत्रणा मजबूत करण्यासाठी या कॉन्क्लेव्हचे आयोजन केले जात आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वैज्ञानिक आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *