शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात : नितीन गडकरी

Union Transport Minister Nitin Gadkari केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News

Farmers come together to form agricultural production companies: Nitin Gadkari

शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात : नितीन गडकरी

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञान तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, असं आवाहन केंद्रीय मंत्री आणि अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रणेते नितीन गडकरी यांनी केलं आहे.

Union Transport Minister Nitin Gadkari केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo
अ‍ॅग्रो व्हिजन फाऊंडेशन आणि एपिडा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरात, ‘विदर्भातील फळे आणि भाजीपाला तसंच कृषी उत्पादनात निर्यातीची संधी’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. या चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी नितीन गडकरी बोलत होते. कृषी क्षेत्रात नव्यानं येणारं तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातून शेतक-यांनी रचलेल्या यशोगाथा तयार करुन त्या इतर शेतक-यांपर्यंत जाणं आवश्यक आहे.

निर्यातीसाठी आपले उत्पादन तंत्रज्ञान वापरुन निर्यातक्षम करावं लागेल, त्यासाठी अधिक पैसा लागणार आहे, यासाठी शेतक-यांनी संघटीत होऊन कृषी उत्पादक कंपन्या उभाराव्या, त्यामाध्यमातून एकत्रितपणे हे सर्व करणं शक्य होईल, असं ते  म्‍हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *