Padma Shri Daya Pawar Memorial Award announced
पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर
मुंबई: साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे.’ या सह भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दया पवार प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं वितरण मुंबईत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २० सप्टेंबरला एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.
यंदाचा हा चोविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com