पुढील 25 वर्ष सरकारचं लक्ष विज्ञान आणि नवकल्पना यावर केंद्रीत असेल

Union Finance-Minister-Nirmal-Sitharaman अर्थमंत्री निर्मला सीतारामन हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

FM  Nirmala Sitaraman says Government’s focus for next 25 years would be on science, innovation

पुढील 25 वर्ष सरकारचं लक्ष विज्ञान आणि नवकल्पना यावर केंद्रीत असेल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

चेन्नई: भारतातील उच्च शिक्षणाद्वारे जगातील सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी तयार झाले असून मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ तयार करण्यात अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

Union Finance-Minister-Nirmal-Sitharaman अर्थमंत्री निर्मला सीतारामन हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
File Photo

चेन्नईजवळील कांचीपुरम इथं भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान,व्यवस्थापन आणि आराखडा (Indian Institute of Information Technology, Management and Design ) संस्थेच्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या.

58 जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी आहेत.अग्रेसर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिक चांगल्या शैक्षणिक अनुभवाकरिता शिक्षण प्रणालीमध्ये सतत सुधारणा करणं आवश्यक असंल्याचं त्या म्हणाल्या.

भारतातील स्टार्ट अप्ससाठी वातावरण अनुकूल असून गेल्या वर्षी 100 युनिकॉर्नमधून एकत्रितपणे 250 अब्ज डॉलर्स उभे केले गेले अशी माहिती त्यांनी दिली. सीतारामन म्हणाल्या की भारतातील कार्यरत वयाची लोकसंख्या 2028 मध्ये चीनला मागे टाकेल आणि 2036 ते 2047 पर्यंत ती 65 टक्के होईल. पुढील 25 वर्ष सरकारचं लक्ष विज्ञान आणि नवकल्पना यावर केंद्रीत असेल, असंही त्या म्हणाल्या.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *