दिल्ली सरकारच्या बस खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी सीबीआय चौकशीला मंजुरी

Image of Buses बसेसची प्रतिमा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Approval of proposal for CBI probe into allegations of alleged corruption in Delhi government bus procurement

दिल्ली सरकारच्या बस खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या प्रस्तावाला मंजुरी

दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल वी के सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या बस खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दिल्ली नगर निगमनं या वर्षीच्या जुनमध्ये एक हजार लो फ्लोअर बसेसची खरेदी केली होती. Image of Buses  बसेसची प्रतिमा हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

अधिकृत सूत्रांनी याची पुष्टी केली की लो-फ्लोअर बसेसच्या खरेदीमध्ये कथित घोर अनियमिततेच्या बाबतीत एलजी सचिवालयाकडे तक्रार आली होती.

या वर्षी जूनमध्ये, एलजीकडे तक्रार करण्यात आली होती की दिल्ली परिवहन महामंडळाकडून बसेसची निविदा आणि खरेदीसाठी समितीचे अध्यक्ष म्हणून दिल्ली परिवहन मंत्री यांची नियुक्ती पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. ही नियुक्ती चुकीच्या कामाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आल्यानंतर ही चौकशी करण्याचा प्रस्ताव नायब राज्यपालांनी मंजुर केला आहे. दिल्लीच्या परिवहन मंत्र्यांची निविदा आणि खरेदी समितीच्या अध्यक्षपदी केलेली निवडही या भ्रष्टाचाराला मदत होण्यासाठीच केल्याची तक्रारही या संदर्भात करण्यात आली होती. ही तक्रार दिल्लीच्या मुख्य सचिवांकडे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पाठवण्यात आली आहे.

अहवालात मुख्य सचिवांनी काही अनियमितता निदर्शनास आणून दिल्या होत्या. यानंतर एलजीने ही तक्रार सीबीआयकडे पाठवली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *