Chance of rain in all parts of the state in next 2 days
येत्या २ दिवसात राज्याच्या सर्व विभागांमध्ये पावसाची शक्यता
पुणे: गेल्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं आज पालघर, ठाणे, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
आगामी काही दिवसात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधे जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.
कुमाउं आणि त्यालगतच्या गढवालमधल्या क्षेत्रातही जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी वेधशाळेनं यलो अलर्ट जारी केला आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com