भू-सीमा करारामुळे देशाच्या ईशान्य भारतात दहशतवादी घटना कमी

Foreign Minister Dr Jaishankar परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Due to the land border agreement, terrorist incidents have reduced in North East India Foreign Minister Dr Jaishankar’s opinion

भू-सीमा करारामुळे देशाच्या ईशान्य भारतात दहशतवादी घटना कमी झाल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच मत

बडोदा: २०१५ मध्ये बांगलादेशाबरोबर केलेल्या भू-सीमा सामंजस्य करारामुळे ईशान्य भारतात दहशतवादी घटनांचं प्रमाण कमी झालं आहे.Foreign Minister Dr Jaishankar परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

बांगलादेशातल्या कट्टरवाद्यांना शरण देणं बंद केल्यानं ईशान्येकडच्या राज्यात दहशतवादी घटना कमी झाल्या असल्याचं मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर त्यांनी सांगितलं. ते काल बडोदा इथं एका कार्यक्रमाला संबोधित करत होते.

नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कुशल कुटनितीमुळे इतर देशांना दहशतवादाला गंभीरपणे घ्यावं लागलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहशतवादाला सर्वात जास्त प्रोत्साहन पाकिस्तानने दिलं असून भारत, दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात जागतिक पातळीवर समर्थन मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

इतर देश पहिल्यांदा या विषयाकडे दुर्लक्ष करायचे परंतु भारतानं दहशतवाद्यांवर अंकुश ठेवल्यानं आज दहशतवादी कारवाया नियंत्रणात आल्या आहेत. हा आपण अवलंबलेल्या कुटनितीचा परिणाम असल्याचं जयशंकर म्हणाले.

नियंत्रण रेषेपलीकडचा दहशतवाद कदापिही सहन केला जाणार नाही, असं भारतानं संयुक्त राष्ट्र महासभेत स्पष्ट सांगितलं होतं, पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी कश्मीर प्रश्नी व्यक्त केलेल्या मतांवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती असं डॉ. जयशंकर यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *