बहि:शाल शिक्षण (Extramural Education)मंडळाचे कार्यक्रम सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Programs of Extramural Education: School Board of Education started

बहि:शाल शिक्षण (Extramural Education) मंडळाचे कार्यक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारे कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कोविड काळात या कार्यक्रमात खंड पडला होता.Savitribai Phule Pune University

बहि:शाल विभागातर्फे पुणे येथे दोन तर अहमदनगर व नाशिक येथे प्रत्येकी एक कृतीसत्राचे आयोजन करून वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती बहि:शाल मंडळाचे नवनियुक्त मानद संचालक डॉ.हरिश्चंद्र नवले यांनी सांगितले.

बहि:शाल शिक्षण मंडळाची स्थापना १२ जानेवारी १९५१ झाली आहे. गेल्या सात दशकांपासून बहि:शाल शिक्षण मंडळाने ज्ञानविस्तार व लोकशिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले आहे.

मंडळाकडून ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाची स्थापना करून त्यामार्फत ज्येष्ठांसाठी निबंधलेखन व चर्चा परिसंवाद संघ स्पर्धा, नियतकालिक स्पर्धा, संत गाडगेबाबा व्याख्यानमाला, तसेच विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. येणाऱ्या काळात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागिकांसाठी व्याख्याने, स्पर्धा आणि शिबिरांच्या कार्यक्रमांचा यामध्ये अंतर्भाव आहे, असेही डॉ.नवले यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *