Bhumi Pujan of Railway Pit Line at Aurangabad Railway Station by Railway Minister Ashwini Vaishnav
औरंगाबाद रेल्वे स्थानकात रेल्वे पीटलाईनचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते भूमीपूजन
औरंगाबाद : देशाच्या सर्व भागात वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जाणार असून, मराठवाड्यातल्या लातूर शहरातल्या रेल्वे डबे निर्मिती कारखान्यात, या वंदे भारत रेल्वे डब्यांची निर्मिती केली जाणार असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. औरंगाबाद रेल्वे स्थानकात रेल्वे पीटलाईनचं भूमीपूजन आज वैष्णव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांसाठी उभारण्यात येत असलेल्या पीटलाईन्सची पायाभरणी आज झाली. जालना स्थानकाचा मॉडेल स्थानक म्हणून विकास होणार आहे, असं ते म्हणाले.
दररोज 14 किलोमीटर रेल्वे लाईन बांधली जात आहे, तर 200 रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत, दररोज 14 किलोमीटर रेल्वे लाईनची निर्मिती केली जात आहे, तर साठ हजार कोटी रुपये खर्चून 200 रेल्वे स्थानके विकसित केली जात आहेत.रेल्वेमंत्री मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
वंदे भारत गाड्या लवकरच संपूर्ण देशात रुळतील असे सांगून श्री. वैष्णव यांनी सांगितले की, लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच कारखाना या स्वदेशी गाड्यांना आवश्यक असलेले डबे विकसित करण्यात मोठी भूमिका बजावेल. गती शक्ती प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा महामार्ग, हवाई मार्ग किंवा रेल्वेने जोडला जाईल, असेही ते म्हणाले.
भारत गौरव यात्रेअंतर्गत महाभारत तसंच शिर्डीचे साईबाबा या संकल्पनांवर आधारित रेल्वे सुरु करण्यात आल्या असून, भारतीय संस्कृतीवर आधारित आणखी काही भारत गौरव यात्रा रेल्वे गाड्या सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये निधी देण्यात आला असल्याचं ते म्हणाले.
औरंगाबाद रेल्वे विभाग मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्ग मंजूर करण्यात यावा, औरंगाबाद-कन्नड-चाळीसगाव रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यात यावं, इत्यादी मागण्या अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यावेळी केल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com