Ration card holders will get a Diwali gift
राज्यातल्या शिधापत्रिकाधारक सुमारे पावणे २ कोटी कुटुंबांना १०० रुपयांचं दिवाळीच्या फराळाचं साहित्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पावणे २ कोटी कुटुंबांना अवघ्या १०० रुपयात फराळासाठी आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला मंत्रिमंडळ बैठकीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या पावणे २ कोटी कुटुंबांना अवघ्या १०० रुपयात फराळासाठी आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५१३ कोटी २४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “शिधापत्रिकाधारक सुमारे पावणे २ कोटी कुटुंबांना १०० रुपयांचं दिवाळीच्या फराळाचं साहित्य”