पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY Insurance

Farmers urged to participate in revamped weather-based crop insurance scheme

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहार मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या ९ फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.Pradhan Mantri Fasal Bima Yojana

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून ३० जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

या योजनेत सहभागाची द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम १ लाख ६ हजार ६६७ रुपये आहे.

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम २६ हजार ६६७ रुपये, केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ रुपये, पपई फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरीता विमा संरक्षित रक्कम ११ हजार ६६७ रुपये असून या तिन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *